भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारसिंधु हा दुस्तर । ल्लुंघवे उल्लंघितां पार । बहुत वाहाविलें दूर । न लगे चि तीर पैल थडी

sansarasindhu ha dustar | llunghave ullanghitan par | bahut vahavilen dur | na lage chi tir pail thadi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संसारसिंधु हा दुस्तर । ल्लुंघवे उल्लंघितां पार । बहुत वाहाविलें दूर । न लगे चि तीर पैल थडी ॥१॥ किती जन्म जाला फेरा । गणित नाहीं जी दातारा । पडिलों आवती भोंवरा । बहुता थोरा वोळसिया ॥ध्रु.॥ वाढलों परी नेणती बुद्धी । नाहीं परतली धरिली शुद्धी । मग म्यां विचारावें कधीं । ऐसी संधी सांडुनिया ॥२॥ अनेक खाणीं आहार निद्रा । भयमैथुनाचा चि थारा । बाळत्व तारुण्य जरा । प्रधान पुरा भोग तेथें ॥३॥ ऐसीं उल्लंघूनि आलों स्थळें । बहु भोवंडिलों काळें । आतां हें उगवावें जाळें । उजेडा बळें दिवसाच्या ॥४॥ सांडीन या संसाराची वाट । बहु येणें भोगविले कष्ट । दावी सत्या ऐसें नष्ट । तुका म्हणे भ्रष्ट झालों देवद्रोही ॥५॥