भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारा आलिया उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा

sansara aliya utha veg kara | sharan ja udara panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संसारा आलिया उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥ देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥ देता देवविता नेता नेवविता । येथ याची सत्ता काय आहे ॥२॥ निमित्याचा धनी केला असे प्राणी । तुका म्हणे म्हणोनि व्यर्थ गेला ॥३॥