भजनी मालिका
← भजनांकडे परत

संकोचोनि काय झालासी लहान । घेई अपोशण ब्रम्हांडाचें

sankochoni kay jhalasi lahan | ghei aposhan bramhandachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संकोचोनि काय झालासी लहान । घेई अपोशण ब्रम्हांडाचें ॥१॥ करोनि पारणें आंचवें संसारा । उशीर उशिरा लावूं नको ॥ध्रु.॥ घरकुलीनें होता पडिला अंधार । तेणें केलें फार कासावीस ॥२॥ झुगारूनि दुरी लपविलें काखे । तुका म्हणे वाखे कौतुकाचे ॥३॥