भजनी मालिका
← भजनांकडे परत

संकोचतो जीव महत्वाच्या भारें । दासत्व चि बरें बहु वाटे

sankochato jiv mahatvachya bharen | dasatva chi baren bahu vate

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संकोचतो जीव महत्वाच्या भारें । दासत्व चि बरें बहु वाटे ॥१॥ कळावी जी माझी आवडी हे संतां । देणें तरि आतां हें चि द्यावें ॥ध्रु.॥ तुमचे चरण पावविलों सेवा । म्हणउनि हेवा हाचि करीं ॥२॥ विनवुनी तुका वंदितो चरण । लेखा रजरेण चरणींचा ॥३॥