भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांखिळलों प्रीती गळां । भुंके वेळा जाणोनियां

sankhilalon priti galan | bhunke vela janoniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांखिळलों प्रीती गळां । भुंके वेळा जाणोनियां॥१॥ तुमचें मी केशीराजा । सुनें या काजा पाळिलों ॥ध्रु.॥ आलें गेलें कळे वाटा । कोण निटा वाकडिया ॥२॥ तुका म्हणे आलें वारी । दुरितें दुरी नातळतां ॥३॥