भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगतों या मना तें माझें नाइके । घातावरी टेंके चांडाळ हें

sangaton ya mana ten majhen naike | ghatavari tenke chandal hen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांगतों या मना तें माझें नाइके । घातावरी टेंके चांडाळ हें ॥१॥ म्हणऊनि पाहे तरतें बुडतें । न ल्हाये पुरतें बळ करूं ॥ध्रु.॥ काय तें संचित न कळे पाहातां । मतिमंद चिंत्ता उपजतें ॥२॥ तुका म्हणे ऐसें बळ नाहीं अंगी । पाहोनियां वेगीं पार ठाकीं ॥३॥