भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगतों तें तुम्हीं अइकावें कानीं । आमुचे नाचणीं नाचूं नका

sangaton ten tumhin aikaven kanin | amuche nachanin nachun naka

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांगतों तें तुम्हीं अइकावें कानीं । आमुचे नाचणीं नाचूं नका ॥१॥ जोंवरी या तुम्हां मागिलांची आस । तोंवरी उदास होऊं नका ॥२॥ तुका म्हणे काय वांयांविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥३॥