भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगतां गोष्टी लागती गोडा । हा तो रोकडा अनुभव

sangatan goshti lagati goda | ha to rokada anubhav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांगतां गोष्टी लागती गोडा । हा तो रोकडा अनुभव ॥१॥ सुख जालें सुख जालें । नये बोले बोलतां ॥ध्रु.॥ अंतर तें नये दिसों । आतां सोस कासया ॥२॥ तुका म्हणे नाही भेद । देवा करू नये वाद ॥३॥