भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडोनीया दों अक्षरां । काय करूं हा पसारा

sandoniya don aksharan | kay karun ha pasara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सांडोनीया दों अक्षरां । काय करूं हा पसारा । विधिनिषेधाचा भारा । तेणें दातारा नातुडेसी ॥१॥ म्हणोनि बोबडा उत्तरीं । वाचें जपें निरंतरीं । नाम तुझें हरी । भवसागरीं तारूं तें ॥ध्रु.॥ सर्वमय ऐसें वेदांचें वचन । श्रुति गर्जती पुराणें । नाहीं आणीक ध्यान । रे साधन मज चाड ॥२॥ शेवटीं ब्रह्मार्पण । या चि मंत्राचें कारण । काना मात्र वांयांविण । तुका म्हणे बिंदलीं ॥३॥