भजनी मालिका
← भजनांकडे परत

संपदा सोहळा नावडे मनाला । करी तें टकळा पंढरीचा

sampada sohala navade manala | kari ten takala pandharicha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संपदा सोहळा नावडे मनाला । करी तें टकळा पंढरीचा ॥१॥ जावें पंढरिसी आवडी मनासी । कधीं एकादशी आषाढी हे ॥२॥ तुका म्हणे ऐसें आर्त ज्याचे मनीं । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥३॥