भजनी मालिका
← भजनांकडे परत

समर्थपणें हे करा संपादणी । नसतें चि मनीं धरिल्याची

samarthapanen he kara sampadani | nasaten chi manin dharilyachi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
समर्थपणें हे करा संपादणी । नसतें चि मनीं धरिल्याची ॥१॥ दुसऱ्याचें येथें नाहीं चालों येत । तरि मी निवांत पाय पाहें ॥ध्रु.॥ खोटियाचें खरें खरियाचें खोटें । मानलें गोमटें तुम्हांसी तें ॥२॥ तुका म्हणे तुम्हां सवें करितां वाद । होईजेतें निंद्य जनीं देवा ॥३॥