भजनी मालिका
← भजनांकडे परत

समर्थाचें केलें । कोणां जाईल मोडिलें

samarthachen kelen | konan jail modilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
समर्थाचें केलें । कोणां जाईल मोडिलें ॥१॥ वांयां करावी ते उरे । खटपटें सोस पुरे ॥ध्रु.॥ ठेविला जो ठेवा । आपुलाला तैसा खावा ॥२॥ ज्याचें त्याचें हातीं । भुके तयाची फजिती ॥३॥ तुका म्हणे कोटी । बाळे जाले शूळ पोटी ॥४॥