भजनी मालिका
← भजनांकडे परत

समर्थाचे सेवे कोठें नाहीं घात । पाहों नये अंत पांडुरंगा

samarthache seve kothen nahin ghat | pahon naye ant panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
समर्थाचे सेवे कोठें नाहीं घात । पाहों नये अंत पांडुरंगा ॥१॥ आहे तैसी नीत विचारावी बरी । येऊनी भीतरी वास करा ॥ध्रु.॥ निढळ राखिलें तरी भयाभीत । हर्षामर्ष चित्त पावतसे ॥२॥ तुका म्हणे तरी कळेल निवाड । दर्शनाची चाड शुभकीर्ति ॥३॥