भजनी मालिका
← भजनांकडे परत

समर्थ या नांवें दिनांचा कृपाळ । हें तंव सकळ स्वामीअंगीं

samartha ya nanven dinancha krupal | hen tanv sakal svamiangin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
समर्थ या नांवें दिनांचा कृपाळ । हें तंव सकळ स्वामीअंगीं ॥१॥ मज काय लागे करणें विनवणी । विदित चरणीं सकळ आहे ॥ध्रु.॥ दयासिंधु तुम्हां भांडवल दया । सिंचावें आतां या कृपामृते ॥२॥ तुका म्हणे अहो पंढरिनिवासे । बहु जीव आसे लागलासे ॥३॥