भजनी मालिका
← भजनांकडे परत

साकरेची गोणी बैलाचिया पाठी । तयासी सेवटीं करबाडें

sakarechi goni bailachiya pathi | tayasi sevatin karabaden

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साकरेची गोणी बैलाचिया पाठी । तयासी सेवटीं करबाडें ॥१॥ मालाचे पैं पेटे वाहाताती उंटें । तयालागीं कांटे भक्षावया ॥ध्रु.॥ वाउगा हा धंदा आशा वाढविती । बांधोनियां देती यमा हातीं ॥२॥ ज्यासी असे लाभ तोचि जाणे गोडी । येर तीं बापुडीं सिणलीं वांयां ॥३॥ तुका म्हणे शहाणा होई रे गव्हारा । चोऱ्यासीचा फेरा फिरों नको ॥४॥