भजनी मालिका
← भजनांकडे परत

सकळीच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें

sakalichya payan majhi vinavani | mastak charanin thevitasen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सकळीच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । बरें पारखुन बांधा गांठी ॥ध्रु.॥ फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हामाल भारवाही ॥२॥ तुका म्हणे चाली जाली चहूं देशी । उतरला कसीं खरा माल ॥३॥