भजनी मालिका
← भजनांकडे परत

सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकांसी

sajjan to shabda satya jo mani | chhali durjan anikansi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकांसी ॥१॥ एक गुण तो केला दोंठायीं । ज्याचा त्यास पाहीं जैसा तैसा ॥ध्रु.॥ भाविक शब्द बोले वाणीचा । लटिका वाचा वाचाळ तो ॥२॥ परउपकार घडे तोचि भला । नाठ्याळ तयाला दया नाहीं ॥३॥ जाणीवंत तो पायरी जाणे । अधम तो नेणे खुंट जैसा ॥४॥ हित तें अनहित केलें कैसें । तुका म्हणे पिसें लागलें यासी ॥५॥