भजनी मालिका
← भजनांकडे परत

सहज पावतां भगवंतीं परि हीं विकल्पें परतीं । फुकाची हे चित्तीं आठवण न धरिती

sahaj pavatan bhagavantin pari hin vikalpen paratin | phukachi he chittin athavan na dhariti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सहज पावतां भगवंतीं परि हीं विकल्पें परतीं । फुकाची हे चित्तीं आठवण न धरिती ॥१॥ हरी व्यापक सर्वगत हें तंव मुख्यत्वें वेदांत । चिंतनासी चित्त असों द्यावें सावध ॥ध्रु.॥ विरजाहोम या चि नांवें देह नव्हे मी जाणावें । मग कां जी यावें वरी लागे संकल्पा ॥२॥ कामक्रोधे देह मिळण स्वाहाकारीं कैंचें पुण्य । मंत्रीं पूजियेला यज्ञाने मनमुंडण नव्हे चि ॥३॥ अनन्यभक्तीचे उपाय ते या विठोबाचे पाय । ध्याइल तो काय जाणे चुकों मारग ॥४॥ आतां सांगे तुका एक तुम्ही चुकों नका । सांडीमांडी धोका शरण रिघतां गोमटें ॥५॥