भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधुनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकातें डोळां न पाहावे

sadhuni bachanag khati tola tola | anikaten dolan na pahave

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साधुनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकातें डोळां न पाहावे ॥१॥ साधुनी भुजंग धरितील हातीं । आणिकें कापती देखोनियां ॥२॥ असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ॥३॥