भजनी मालिका
← भजनांकडे परत

साधन संपित्त हें चि माझें धन । सकळ चरण विठोबाचे

sadhan sampitta hen chi majhen dhan | sakal charan vithobache

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साधन संपित्त हें चि माझें धन । सकळ चरण विठोबाचे ॥१॥ शीतळ हा पंथ माहेराची वाट । जवळी च नीट सुखरूप ॥ध्रु.॥ वैष्णवांचा संग रामगाणें गाणें । मंडित भूषण अळंकार ॥२॥ भवनदी आड नव्हतीसी जाली । कोरडी च चाली जावें पायी ॥३॥ मायबाप दोघें पाहातील वाट । ठेवूनिया कटीं कर उभी ॥४॥ तुका म्हणे केव्हां देखेन कळस । पळाली आळस निद्रा भूक ॥५॥