भजनी मालिका
← भजनांकडे परत

सद्गदित कंठ दाटो । येणें फुटो हृदय

sadgadit kanth dato | yenen phuto hruday

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सद्गदित कंठ दाटो । येणें फुटो हृदय ॥१॥ चिंतनाचा एक लाहो । तुमच्या अहो विठ्ठला ॥ध्रु.॥ नेत्रीं जळ वाहो सदां । आनंदाचे रोमांच ॥२॥ तुका म्हणे कृपादान । इच्छी मन हे जोडी ॥३॥