भजनी मालिका
← भजनांकडे परत

रूपें गोविलें चित्त । पायीं राहिलें निश्चिंत

rupen govilen chitta | payin rahilen nishchint

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रूपें गोविलें चित्त । पायीं राहिलें निश्चिंत ॥१॥ तुह्मीं देवा अवघे चि गोमटे । मुख देखतां दुःख न भेटे ॥ध्रु.॥ जाली इंद्रियां विश्रांति । भ्रमतां पीडत ते होतीं ॥२॥ तुका म्हणे भेटी । सुटली भवबंदाची गांठी ॥३॥