भजनी मालिका
← भजनांकडे परत

रूपाचें रूपस विठ्ठलनामवेष

rupachen rupas viththalanamavesh

रूपाचें रूपस विठ्ठलनामवेष । पंढरीनिवास आत्माराम ॥ १ ॥ पुंडलिकभाग्य वोळलें संपूर्ण । दिननिशीं कीर्तन विठ्ठल हरी ॥ २ ॥ त्रैलोक्य उद्धरे ऐसी पव्हे त्वरे । कीर्तन निर्धारे तरुणोपाव ॥ ३ ॥ पूण्य केलें चोख तारिले अशेख । जनीं वनीं एकरूप वसे ॥ ४ ॥ वेदादिकमति ज्या रूपा गुंतती । तो आणूनी श्रीपति उभा केला ॥ ५ ॥ निवृत्तीचा सखा विठ्ठलरूप देखा । निरालंब शिखा गगनोदरीं ॥ ६ ॥