भजनी मालिका
← भजनांकडे परत

रिद्धीसिद्धी दासी कामधेनु घरीं । परि नाहीं भाकरी भक्षावया

riddhisiddhi dasi kamadhenu gharin | pari nahin bhakari bhakshavaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रिद्धीसिद्धी दासी कामधेनु घरीं । परि नाहीं भाकरी भक्षावया ॥१॥ लोडे बालिस्तें पलंग सुपत्ती । परि नाहीं लंगोटी नेसावया ॥ध्रु.॥ पुसाल तरि आम्हां वैकुंठींचा वास । परि नाहीं राह्यास ठाव कोठें ॥२॥ तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे । परि नाहीं कोणाचें उणे पुरें ॥३॥