भजनी मालिका
← भजनांकडे परत

राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेशीं

raulasi jatan tras mani motha | baisato chohotan adareshin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेशीं ॥१॥ न करी स्नान संध्या न म्हणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहर्नीशी ॥ध्रु.॥ देवाब्राम्हणासी जाईना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥२॥ सुगंध चंदन सांडोनियां माशी । बैसे दुगपधीशीं अत्याआदरें॥३॥ तुका म्हणे अरे ऐक भाग्यहीन । कां रे रामराणा विसरसी ॥४॥