भजनी मालिका
← भजनांकडे परत

रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन

ratri divas amhan yuddhacha prasang | antarbahya jag ani man

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥१॥ जीवा ही आगोज पडती आघात । येऊनियां नित्य नित्य करी ॥ध्रु.॥ तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळें । अवघीयांचें काळें केलें तोंड ॥२॥