भजनी मालिका
← भजनांकडे परत

रत्नाच्या वोवणी कांचे ऐशा घरी । आव्हेरुनी दुरी अधिकारें

ratnachya vovani kanche aisha ghari | avheruni duri adhikaren

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रत्नाच्या वोवणी कांचे ऐशा घरी । आव्हेरुनी दुरी अधिकारें ॥१॥ जातिस्वभाव आला डोळ्यां आड । तया घडे नाड न कळतां ॥ध्रु.॥ कामधेनु देखे जैशा गाईंम्हैसी । आणिकांतें ऐसी करोनियां ॥२॥ तुका म्हणे काय बोलोनियां फार । जयाचा वेव्हार तया साजे ॥३॥