भजनी मालिका
← भजनांकडे परत

राम कृष्ण मूर्ति या पुजीतसे भावे

ram krushna murti ya pujitase bhave

रचनाकार: संत सोपान · अभंग
राम कृष्ण मूर्ति या पुजीतसे भावे । सर्व तुवा व्हावे केशीराजा ॥१॥ रामकृष्ण म्हणे नित्य काळसदा । नेणे दुजा बंदा तुजविण ॥२॥ माहेर आठवे करिता कामना । तुझ्या चरणी वासना जडोनि ठेली ॥३॥ सोपान म्हणे सरते तुजचि आवडते । माझया मनोरथे तूची आशा ॥४॥