भजनी मालिका
← भजनांकडे परत

रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न । चिन्मय अंजन सुदलें डोळां

rakta shvet krushna pit prabha bhinna | chinmay anjan sudalen dolan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न । चिन्मय अंजन सुदलें डोळां ॥१॥ तेणें अंजनगुणें दिव्यदृष्टि झाली । कल्पना निघाली द्वैताद्वैत ॥ध्रु.॥ देशकाळ वस्तुभेद मावळला । आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥२॥ न झाला प्रपंच आहे परब्रम्ह । अहंसोहं ब्रम्ह आकळलें ॥३॥ तत्वमसि विद्या ब्रम्हानंदी सांग । तें चि जाला अंगें तुका आतां ॥४॥