भजनी मालिका
← भजनांकडे परत

राजा प्रजा द्वाड देश । शाक्त वास करिती तो

raja praja dvad desh | shakta vas kariti to

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
राजा प्रजा द्वाड देश । शाक्त वास करिती तो ॥१॥ अधर्माचें उबड पीक । धर्म रंक त्या गांवीं ॥ध्रु.॥ न पिके भूमि कांपे भारें । मेघ वारें पीतील ॥२॥ तुका म्हणे अवघीं दुःखें । येती सुखें वस्तीचि ॥३॥