भजनी मालिका
← भजनांकडे परत

राहो ये चि ठायीं । माझा भाव तुझे पायीं

raho ye chi thayin | majha bhav tujhe payin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
राहो ये चि ठायीं । माझा भाव तुझे पायीं ॥१॥ करीन नामाचें चिंतन । जाऊं नेदीं कोठें मन ॥ध्रु.॥ देईन ये रसीं । आतां बुडी सर्वविशीं ॥२॥ तुका म्हणे देवा । साटी करोनियां जीवा॥३॥