भजनी मालिका
← भजनांकडे परत

रडे अळंकार दैन्याचिये कांती । उत्तमा विपित्तसंग घडे

rade alankar dainyachiye kanti | uttama vipittasang ghade

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रडे अळंकार दैन्याचिये कांती । उत्तमा विपित्तसंग घडे ॥१॥ एकाविण एक अशोभ दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥ध्रु.॥ रांधूं नेणे तया पुढील आइतें । केलें तें सोइतें वांयां जाय ॥२॥ तुका म्हणे चिंतामणि शेळी गळा । पावे अवकळा म्हणउनी ॥३॥