भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वीहूनि बहु भक्त सांभाळिले । नाहीं अव्हेरिले दास कोणी

purvihuni bahu bhakta sambhalile | nahin avherile das koni

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पूर्वीहूनि बहु भक्त सांभाळिले । नाहीं अव्हेरिले दास कोणी ॥१॥ जेजे शरण आले तेते आपंगिले । पवाडे विठ्ठले ऐसे तुझे ॥ध्रु.॥ मिरवे चरणीं ऐसीये गोष्टीचें । भक्तसांभाळाचें प्रेम ऐसें ॥२॥ तुका म्हणे आम्हांसाठी येणें रूपा । माझ्या मायबापा पांडुरंगा ॥३॥