भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुंडलीकपेठ वैष्णवाचा हाट

pundalikapeth vaishnavacha hat

पुंडलीकपेठ वैष्णवाचा हाट । करिती बोभाट हरिनामाचा ॥ १ ॥ वाळलें अंबर अमृततुषार । झेलीत अमर चकोर झाले ॥ २ ॥ देव मुनी सर्व ब्रह्मादिक लाठे । पंढरीये पेठे प्रेमपिसे ॥ ३ ॥ निवृत्ति निर्वाळिला ज्ञानदेव सोपान । खेचर तल्लीन वीनटला ॥ ४ ॥