भजनी मालिका
← भजनांकडे परत

पुढीलांचे सोयी माझ्या मना चाली । मताची आणिली नाहीं बुद्धी

pudhilanche soyi majhya mana chali | matachi anili nahin buddhi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पुढीलांचे सोयी माझ्या मना चाली । मताची आणिली नाहीं बुद्धी ॥१॥ केलासी तो उभा आजवरी संतीं । धरविलें हातीं कट देवा ॥ध्रु.॥ आहे तें ची मागों नाहीं खोटा चाळा । नये येऊं बळा लेंकराशीं ॥२॥ तुका म्हणे माझा साक्षीचा वेव्हार । कृपण जी थोर परी तुम्ही ॥३॥