भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रीतिभंग माझा केला पांडुरंगा । भक्तिरस सांगा कां जी तुह्मीं

pritibhang majha kela panduranga | bhaktiras sanga kan ji tuhmin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रीतिभंग माझा केला पांडुरंगा । भक्तिरस सांगा कां जी तुह्मीं ॥१॥ न म्हणऊनि कांहीं न ठेवीं चि उरी । आलों वर्मावरी एकाएकीं ॥ध्रु.॥ न देखों चि कांहीं परती माघारी । उरली ते उरी नाहीं मुळीं ॥२॥ तुका म्हणे आला अंतरासी खंड । तरि माझें तोंड खवळिलें ॥३॥