भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रीति नाही राया वर्जिली ते कांता । परी तिची सत्ता जगावरी

priti nahi raya varjili te kanta | pari tichi satta jagavari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रीति नाही राया वर्जिली ते कांता । परी तिची सत्ता जगावरी ॥१॥ तैसे दंभी जालों तरी तुझे भक्त । वास यमदूत न पाहाती ॥ध्रु.॥ राजयाचा पुत्र अपराधी देखा । तो काय आणिकां दंडवेल ॥२॥ बत्तर खोडी परी देवमण कंठीं । तैसो जगजेठी म्हणे तुका ॥३॥