भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रीति करी सत्ता । बाळा भीती मातापिता

priti kari satta | bala bhiti matapita

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रीति करी सत्ता । बाळा भीती मातापिता ॥१॥ काय चाले त्याशीं बळ । आळी करितां कोल्हाळ ॥ध्रु.॥ पदरीं घाली मिठी । खेदी मागें पुढें लोटी ॥२॥ बोले मना आलें । तुका साहिला विठ्ठलें ॥३॥