भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रेमाचा पुतळा विठोबा सावळा

premacha putala vithoba savala

रचनाकार: संत बंका · अभंग
प्रेमाचा पुतळा विठोबा सावळा । उभा तो देखिला भीमातटीं ॥१॥ कर कटावरी पाउलें साजिरीं । शंख चक्र करीं मिरवतसे ॥२॥ योगियांचा राणा गोपीमोहन कान्हा । भक्तिचा आंदणा घरोघरी ॥३॥ वंका म्हणे ऐसा कृपेचा कोवळा । पाळी भक्तलळा प्रेमासाठीं ॥४॥