भजनी मालिका
← भजनांकडे परत

पोट आलें आतां जीवन आवडी । पुरवावे परवडी बहुतांचे

pot alen atan jivan avadi | puravave paravadi bahutanche

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पोट आलें आतां जीवन आवडी । पुरवावे परवडी बहुतांचे ॥१॥ काय आंचवणा तांतडीचें काम । मागील तीं श्रम न पवाचि ॥ध्रु.॥ वाढितिया पोटीं बहु असे वाव । सांभाळितां ठाव काय वेचे ॥२॥ दाविल्यावांचूनि नाहीं कळों येत । तेथें ही दुश्चित एकपणें ॥३॥ नावेचा भार तो उदकाचे शिरीं । काय हळू भारी तये ठायीं ॥४॥ तुका म्हणे गीतीं गाऊनि गोविंद । करूं ब्रह्मानंदु एकसरें ॥५॥