भजनी मालिका
← भजनांकडे परत

पिंड हा न धरी ब्रह्मार्पण करी

pind ha na dhari brahmarpan kari

पिंड हा न धरी ब्रह्मार्पण करी । विष्णु चराचरीं ग्रंथीं पाहे ॥ १ ॥ तें रूप विठ्ठ्ल ब्रह्माकार दिसे । पंढरी सौरस भींमातीरीं ॥ २ ॥ जगाचे तारक पूण्य पूज्य लोका । तृप्त सनकादिक नामें होती ॥ ३ ॥ पतीतपावन नाम हे जीवन । योगीयाचें ध्यान हरि आम्हां ॥ ४ ॥ वेणुनादीं काला पिंडावती जाला । भाग्य भोगियला दृष्टी पूढें ॥ ५ ॥ निवृत्ति म्हणे ते रूपडें अनंत । विठ्ठल संकेत तरुणोपेव ॥ ६ ॥