भजनी मालिका
← भजनांकडे परत

पवित्र होईन चरित्रउच्चारें । रूपाच्या आधारें गोजिरिया

pavitra hoin charitrauchcharen | rupachya adharen gojiriya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पवित्र होईन चरित्रउच्चारें । रूपाच्या आधारें गोजिरिया ॥१॥ आपुरती बुद्धि पुण्य नाहीं गांठी । पायीं घालीं मिठी पाहें डोळां ॥ध्रु.॥ गाईन ओविया शिष्टांच्या आधारें । सारीन विचारें आयुष्याया ॥२॥ तुका म्हणे तुझें नाम नारायणा । ठेवीन मी मना आपुलिया ॥३॥