भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतिव्रतेची कीर्ती वाखाणितां । सिंदळईंच्या माथां तिडिक उठे

pativratechi kirti vakhanitan | sindalainchya mathan tidik uthe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पतिव्रतेची कीर्ती वाखाणितां । सिंदळईंच्या माथां तिडिक उठे ॥२॥ आमुचें तें आहे सहज बोलणें । नाहीं विचारून केलें कोणीं ॥ध्रु.॥ अंगें उणें त्याच्या बैसे टाळक्यांत । तेणें ठिणग्या बहुत गाळीतसे ॥२॥ तुका म्हणे आम्ही काय करणें त्यासी । ढका खवंदासी लागतसे ॥३॥