भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतिव्रते आनंद मनीं । सिंदळ खोंचे व्यभिचारवचनीं

pativrate anand manin | sindal khonche vyabhicharavachanin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पतिव्रते आनंद मनीं । सिंदळ खोंचे व्यभिचारवचनीं ॥१॥ जळो वर्म लागो आगी । शुद्धपण भलें जगीं ॥ध्रु.॥ सुख पुराणीं आचारशीळा । दुःख वाटे अनर्गळा ॥२॥ शूरा उल्हास अंगीं । गांढया मरण ते प्रसंगीं ॥३॥ शुद्ध सोनें उजळे अगी । हीन काळें धांवे रंगीं ॥४॥ तुका म्हणे तोचि हिरा । घनघायें निवडे पुरा ॥५॥