भजनी मालिका
← भजनांकडे परत

पतित मिरासी । ते म्यां धरिला जीवेंसी

patit mirasi | te myan dharila jivensi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पतित मिरासी । ते म्यां धरिला जीवेंसी ॥१॥ आतां बिळया सांग कोण । ग्वाही तुझें माझें मन ॥ध्रु.॥ पावणांचा ठसा । दावीं मज तुझा कैसा ॥२॥ वाव तुका म्हणे जालें । रोख पाहिजे दाविलें ॥३॥