भजनी मालिका
← भजनांकडे परत

परिसें वो माते माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें

parisen vo mate majhi vinavani | mastak charanin thevitasen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
परिसें वो माते माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥ भागीरथी महादोष निवारणी । सकळां स्वामिणी तीर्थांचिये ॥ध्रु.॥ जीतां भुक्ती मोक्ष मरणें तुझ्या तिरीं । अहिक्यपरत्री सुखरूप ॥२॥ तुका विष्णुदास संतांचें पोसनें । वागपुष्प तेणें पाठविलें ॥३॥