भजनी मालिका
← भजनांकडे परत

परिसाचे अंगें सोनें जाला विळा । वाकणें या कळा हीन नेव्हे

parisache angen sonen jala vila | vakanen ya kala hin nevhe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
परिसाचे अंगें सोनें जाला विळा । वाकणें या कळा हीन नेव्हे ॥१॥ अंतरीं पालट घडला कारण । मग समाधान तें चि गोड ॥ध्रु.॥ पिकली सेंद पूर्वकर्मा नये । अव्हेरु तो काय घडे मग॥२॥ तुका म्हणे आणा पंगती सुरण । पृथक ते गुण केले पाकें॥३॥