भजनी मालिका
← भजनांकडे परत

परिस काय धातु सोने न करीतु । फेडितो निभ्रांतु लोहपांगु

paris kay dhatu sone na karitu | phedito nibhrantu lohapangu

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
परिस काय धातु सोने न करीतु । फेडितो निभ्रांतु लोहपांगु ॥१॥ काय तयाहूनि जालासी बापुडें । फेडितां सांकडें माझे एक ॥ध्रु.॥ कल्तपरु कोड पुरवितो रोकडा । चिंतामणि खडा चिंतिलें तें ॥२॥ चंदनांच्या वासें वसतां चंदन । होती काष्ठ आन वृक्षयाती ॥३॥ काय त्याचें उणें जालें त्यासी देतां । विचारीं अनंता तुका म्हणे ॥४॥