भजनी मालिका
← भजनांकडे परत

परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें

parimal mhanuni cholun naye phul | khaun naye mul avadaten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥१॥ मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥२॥ कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम । तुका म्हणे वर्म दावूं लोकां ॥३॥