भजनी मालिका
← भजनांकडे परत

परेसि परता पश्‍यंति वरुता

paresi parata pash‍yanti varuta

परेसि परता पश्‍यंति वरुता । मध्यमे तत्त्वता न कळे हरी ॥१॥ तें हें कृष्णरूप गौळियांचे तप । यशोदे समीप समीप नंदाघरी ॥२॥ चोखट चोखाळ मनाचे मवाळ । कांसवीचा ढाळ जया नेत्रीं ॥३॥ निवृत्ति सर्वज्ञ गुरूची धारणा । ब्रह्म सनातना माजि मन ॥४॥